भारतीय वंशाच्या नागरिकांसाठीच्या घरांचा पहिला टप्पा श्रीलंकेत हस्तांतरित 

कोलंबो: श्रीलंकेमध्ये भारतीय वंशाच्या, प्रामुख्याने तामिळी नागरिकांसाठी भारताने बांधलेल्या घरांचा पहिला टप्पा आज श्रीलंकेला हस्तांतरित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या समारंभामध्ये सहभागी झाले होते.
“समृद्ध, सुरक्षित आणि शांत श्रीलंकाच आम्हाला नेहमी अभिप्रेत आहे. या ठिकाणी सर्वांना विकसित होण्याची समान संधी असेल.’ असे पंतप्रधान म्हणाले. शेजारी देशांमध्ये श्रीलंकेला भारताकडून नेहमीच विशेष स्थान दिले आहे. यापुढेही ते कायम राहिल, असेही पंतप्रधान म्हणाले.
यापुढे श्रीलंकेतील तामिळी नागरिकांसाठी आणखी 10 हजार घरे बांधून देण्यासाठी करार केला जात आहे. त्यासाठी 12 अब्ज श्रीलंकन रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. या 404 घरांसाठी एकूण 350 दशलक्ष डॉलर खर्च आला आहे. या घरांबरोबर जमिनीचे अधिकार श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्‍त तरनजीत सिंह संधू, मंत्री पलानी दिगंबरम, नवीन दिस्सानायके आणि गायंथा करुनाथिलके यांनी लाभार्थ्यांना सुपूर्त केले, असे भारतीय दूतावासाने सांगितले. श्रीलंकेतील तामिळी नागरिक प्रामुख्याने चहा आणि कॉफीच्या शेतीमध्ये आहेत. 19 व्या शतकात ब्रिटीश राजवटीच्या काळात ते श्रीलंकेत नेले गेले आणि तेथेच स्थायिक झाले आहेत. त्यांना जरी श्रीलंकेचे नागरिकत्व मिळाले असले तरी त्यांच्यासमोर घरांचा मोठा प्रश्‍न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)