भारतीय लष्कराने वर्षभरात दहशतवादी मारण्याचे केले त्रिशतक

file photo

जम्मू (जम्मू-काश्‍मीर): भारतीय लष्कराने जम्मू-काश्‍मीरमध्ये सन 2018 मध्ये दहशतवादी मारण्याचे त्रिशतक पूर्ण केले आहे. लष्कराच्या 15 कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट यांनी ही माहिती दिली आहे. सुरक्षा दलांमधील उत्कृष्ट ताळमेळ आणि मोहिमा नियोजनाचे स्वातंत्र्य यामुळे वर्षभरात लष्कराला 311 दहशतवादी मारता आले असे त्यांनी सांगितले आहे. गेल्या दशकभरात काश्‍मीर खोऱ्यात मारलेल्या दहशतवाद्यांचा हा उच्चांक आहे. यापूर्वी सन 2010 मध्ये 232 दहशतवाद्यांना मारण्यात लष्कराला यश मिळाले होते. सन 2018 मध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या तीन आठवड्यातच 88 दहशतवादी मारले गेले आहेत.

गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार या वर्षात दहशतवादी कायवायांमध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षे दहशतदाच्या 342 घटना घडल्या होत्या, तर या वर्षी हा आकडा 429 पर्यंत पोहचला आहे. याचे कारण पाकिस्तानी दहशतवाद्यांना स्थानिकांची मिळणारी साथ हे आहे. गेल्या वर्षी 40 नागरिक मारले गेले होते, तर या वर्षी 77 नागरिक मारले गेले आहेत, गेल्या वर्षी आणि चालू वर्षीही 80 जवान शहीद झाल्याचे त्यांनी सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)