भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरात 2 पाकिस्तानी सैनिक ठार

श्रीनगर – शस्त्रसंधी भंगाची आगळीक करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. ही घटना जम्मू-काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडली.

सोमवारी रात्री भारतीय हद्दीतील तंगधार क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांच्या एका गटाने केला. घुसखोरांना मदत व्हावी या उद्देशातून पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीत मारा सुरू केला. त्या माऱ्याला भारतीय लष्कराच्या सतर्क जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये 2 पाकिस्तानी सैनिक मारले गेले.

भारतीय जवानांच्या प्रत्युत्तराला घाबरून घुसखोरीचा बेत सोडून देत दहशतवाद्यांनी माघारी पाकिस्तानी हद्दीत पलायन केले. पाकिस्तानी सैनिक सातत्याने शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय हद्दीत मारा करतात. त्या नापाक कृत्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)