नवी दिल्ली: रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेने जनजागृतीसाठी ‘एक सफर रेल के साथ’ मोहीम राबवली आहे. रेल्वे रुळ न ओलांडणे आणि स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी मध्य रेल्वेने कलाकारांचे सहाय्य घेतले आहे. ‘एक सफर रेल के साथ’ या सुरक्षित रेल्वे प्रवासाचा संदेश देणाऱ्या मोहिमेचे दूत म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेच्या सुरक्षा प्रचार मोहिमेत बिग बी सहभागी झाले आहेत. रूळ ओलांडणे जीवावर बेतू शकते, अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येते. असे असतानाही पुलाचा किंवा सबवेचा वापर न करता रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून याआधीही बरेच मोहीम राबवले गेले. ‘एक सफर रेल के साथ’ या मोहिमेअंतर्गत विविध सेलिब्रिटी भारतीय रेल्वेतील प्रवासादरम्यानचा त्यांचा अनुभव एका लघुपटाद्वारे सांगतील. या लघुपटाच्या अखेरीस सुरक्षित रेल्वे प्रवासाचा संदेश देण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)