भारतीय रस्त्यांवर लवकरच धावणार तीनचाकी इलेक्ट्रिक कार

मुंबई : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात रोज नवनवीन संशोधने होत आहेत. विशेषतः मागील वर्षभरात तर यात आणखी भर पडली आहे. स्वस्तात इलेक्ट्रिक कार घेण्याचे भारतीयांचे स्वप्न यामुळे पूर्ण होत आहे. यात आता आणखी एक इलेक्ट्रिक कार दाखल झाली असून ती चक्क तीन चाकांची आहे. ही कार स्वस्त असण्याचा दावा उत्पादक कंपनी स्ट्रॉम मोटर्सने केला आहे.

या कारची विक्री या वर्षीच्या शेवटी सुरू होणार आहे. तर सुरुवातीला ही कार मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. या कारमध्ये फक्त दोन जण प्रवास करू शकणार आहेत. ही कार तीन प्रकारात सादर केली आहे. या कारला पुढे दोन टायर आणि मागे एक टायर आहे. ही कार पूर्ण चार्जिंग होण्यासाठी ६ ते ८ तासांचा वेळ लागतो. ब्लू, नियन ब्लू, रेड एंड ब्लॅक अशा चार रंगांमध्ये उपलब्ध असेल.

-Ads-

मनोरंजनासाठी ७ इंचाचा टचस्क्रीन असून तो वायर कंट्रोलने काम करतो. तसेच वॉइस कमांड देऊन त्याला सुरू करता येते. तसेच पार्किंग कॅमेरादेखील दिला आहे, असे कंपनीने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)