काठमांडू (नेपाळ) – एका भारतीय यात्रेकरूच्या मृत्यूनंतर नेपाळमधील खासगी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती निलंबित करण्यात आली आहे. मनांग एयर असे हेलिकॉप्टर सेवा निलंबित करण्यात आलेल्या खासगी हेलिकॉप्टर सेवा कंपनीचे नाव आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी मुंबईहून आलेल्या कार्तिक नागेंद्र कुमार मेहता (42) नावाच्या यात्रेकरूचा हिल्सा भागातील हेलिपॅडवर मनांग एयर्सच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

गेल्या आठवड्यात नेपाळमधील हिल्स भागातील हेलिपॅडवर ही दुर्घटना घडली. हेलिपॅडवर उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी जात असलेल्या कार्तिक मेहता यांना हेलिकॉप्टरच्यामागील पंख्याचा धक्का लागून त्यांचे शिर धडावेगळे झाले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्य समिती स्थापन करण्यात आली असून तिने आपला अहवाल 30 दिवसांच्या आत द्यावयाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)