वाघोली, – अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या वर्धापन दिनानिमित्त वाघोली (नॅशनल कॉम्प्युटर्स) येथील कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचे फॉर्म वाटप देखील करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये एकूण 54 जणांनी रक्तदान केले. यासाठी पुणे ब्लड बॅंकेच्या वतीने जयेश गावडे आणि टीमने परिश्रम घेतले. रक्तदान केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या वतीने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी व पुणे जिल्ह्याच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद वारघडे, राज्य सचिव अजित आव्हाळे, पुणे जिल्हाध्यक्ष अमोल गावडे, उपाध्यक्ष तुकाराम आव्हाळे, कार्याध्यक्ष संदीप कोलते, संघटक संदीप कटके, राज्य प्रवक्ते राहुल रोहकले, सोलापूर जिल्हाध्यक्ष अतुल काळे, हवेली तालुकाध्यक्ष सुजाता वाळके, नॅशनल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे सभासद आणि प्रशिक्षक यांनी परिश्रम घेतले.