भारतीय महिला पुन्हा पराभूत 

मंधना आणि मितालीची खेळी वाया 
मुंबई – येथील ब्रेबॉर्न स्टेडीयम वर झालेल्या भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील सामन्यात इंग्लंडच्या महिला संघातील सलामीवीर डॅनिएली व्याटच्या दमदार कामगीरीने भारतीय सलामीवीर स्मृती मंधाना आणि मिताली राज यांची खेळी वाया गेली. इंग्लंडने हा सामना 7 गडी आणि 8 चेंडू राखत आपल्या नावे केला.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय सलामीवीर स्मृती मंधाना आणि मिताली राज यांच्या धडाकेबाज खेळीने भारताला 20 षटकात 4 बाद 198 धावा करता आल्या. त्या नंतर इंग्लंड महिला संघाने हे आव्हाण 18.4 षटकात केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात पुर्णकरत सामना आपल्या नावे केला.
विजयासाठी 199 धावांची आव्हाण घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंद महिला संघाला त्यांची सलामीवीर डॅनिएली व्याट आणि ब्रिओनी स्मिथ यांनी केवळ 5.2 षटकात 61 धावांची सलामी दीली. त्यांची भागीदारी झुलन गोस्वामीने तोडताना स्मिथला त्रीफळाचीत केले.
स्मिथने 11 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 15 धावा केल्या. या नंतर फलंदाजीस आलेल्या टॅमलिन ब्युमोंटला सोबत घेत व्याटने आपला धडाकेबाज खेळ सुरुच ठेवला त्या दोघींनी केवळ 9.1 षटकात 96 धावांची भागीदारी केली. ब्युमोंटने 23 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीर व्याटने आपले दूसरे टी-20 शतक साजरे करताना केवळ 64 चेंडूत 15 चौकार आणि पाच उत्तुंग षटकार लगावताना 124 धावा केल्या. व्याटला दिप्ती शर्माने बाद केले. परंतू तो पर्यंत भरपुर उशीर झाला होता कारण व्याटबाद झाली तेंव्हा इंग्लंडच्या 183 धावा झाल्या होत्या. व्याट बाद झाल्या नंतर नताली स्किव्हर (12) आणि हीथर नाईट (8) यांनी विजयाचा सोपस्कार पुर्ण केला.
तत्पुर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने वेगवान सुरुवात केली. भारताच्या सलामीवीर स्मृती मंधाना आणि मिताली राज यांनी 12.05 षटकात 129 धावांची भागीदारी करत धडाकेबाज खेळीचे प्रदर्शन केले. तिरंगी मालीकेत सातत्याने अपयशी ठरणाऱ्या मिताली राज आणि स्मृती मंधनाने पहिल्या चेंडू पासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.
सामन्यात स्मृतीने केवळ 25 चेंडूत आपले अर्धशतक पुर्ण केले. भारताच्या 129 धावा झाल्या होत्या तेंव्हा नताले स्किवरने मंधनाला बाद करत इंग्लंडला पहिला बळी मिळवून दिला. मंधनाने 40 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. मंधना बाद झाल्यानंतर भारताचा धावांचा वेग वाढवन्याच्या प्रयत्नात मिताली देखील बाद झाली. मितालीने 43 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. शेवटाच्या षटकांमध्ये पूजा वस्त्रकारने फटकेबाजी करताना केवळ 10 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 22 धावा करत भारताला 198 धावांपर्यंत मजल मारुन दिली.
संक्षिप्त धावफलक – भारतीय महिला संघ 20 षटकात 4 बाद 198 (मिताली राज 53, स्मृती मंधना 76, हरमनप्रीत कौर 30, टॅश फेरॅन्ट 32-2) पराभूत विरुद्ध इंग्लंड महिला संघ 18.4 षटकात 3 बाद 199 (डॅनिएली व्याट 124, टॅमसिन ब्युमोंट 35, दिप्ती शर्मा 36-2)

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)