भारतीय महिलांचे विजयासह उपान्त्यफेरीत पोहोचण्याचे लक्ष्य 

महिला विश्‍वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धा 
गयाना, दि. 15 – महिला विश्‍वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात एकहाती विजय संपादन करुन स्पर्धेची शानदार सुरुवात केली आहे. त्यातच भारतीय संघाचा आगामी सामना आयर्लंडच्या संघासोबत होणार असून या सामन्यात विजय मिळवून उपान्त्यफेरीत थेट प्रवेश मिळवण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असणार आहे.

विश्‍वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बलाढ्य न्युझीलंडच्या संघाचा 5 गडी आणि 34 धावांनी पराभव केला होता. यावेळी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिक्‍झने फटकेबाजी करताना भारतीय संघाला 194 धावांची मजल मारली. तर, भारतीय गोलंदाजांनी न्युझीलंडच्या फलंदाजांना रोखताना संघाला 34 धावांनी सहज विजय मिळवून दिला. तर, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या संघाचा 6 चेंडू आण्इ 7 गडी राखून पराभव करताना ब गटात अव्वल स्थान मिळवले होते.

तर, दुसरीकडे ब गटातील आपल्या दोन्ही सामन्यात आयर्लंडने आपले दोन्ही सामने गमावले असून त्यामुळे त्यांच्या संघाचा आत्मविश्‍वास काहिसा खालवलेला आहे. यादोन्ही सामन्यात आयर्लंडच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी नोंदवता आली नव्हती. त्यांच्या संघाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात 9 बाद 101 धावांची मजल मारली होती. तर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांना केवळ 93 धावांचीच मजल मारता आली आहे. तर, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्यांच्या गोलंदाजांना केवळ एकच विकेट मिळवण्यात यश मिळाले होते. तर पाकिस्तान विरुद्ध त्यांनी सहा विकेट्‌स मिळवल्या होत्या. त्यामुळे भारता विरुद्धच्या सामन्यात त्यांना चांगली गूलंदाजी करण्याची गरज आहे.

त्यातच भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसध्या लयीत आहे. तीने पहिल्या सामन्यात केवळ 50 चेंडूत शतकी खेळी साकारली होती. त्यामुळे ती याही सामन्यात आपली लय कायम राखण्याचा प्रयत्न करताना दिसून येइल. तर, दुसरी कडे भारतीय संघाची सलामीवीर मिताली राज देखिल मालिकेत चांगली फलंदाजी करत असून तिने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तडाखेबाज अर्धशतकी खेळी करुन भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे आयर्लंडच्या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना आपल्या गोलंदाजी आणि फलम्दाजीमध्ये खुप सुधारणा करावी लागणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –
भारतीय महिला संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधना, मिताली राज, जिमिमा रॉड्रिक्‍झ, वेदा कृष्णमूर्ती, दिप्ती शर्मा, तानिया भाटीया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिश्‍त, दयालन हेमलथा, मानसी जोशी, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी.
आयर्लंड महिला संघ – लॉरा डेलॅनी (कर्णधार), किम गार्थ, सेसिला जॉयेस, इझाबेल जॉयेस, शॉना कावांघ, ऍमी केनिली, गॅबी लेविस, लारा मॅरिट्‌झ, सिआरा मेट्‌कॅल्फे, ल्युसी ओरिली, सेलेस्टे रॅक, एमिअर रिचर्डसन, क्‍लेअर शिलिंग्टन, रिबेका स्टोकेल, मेरीवॅल्ड्रन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)