भारतीय मजदूर संघ करणार निदर्शने

केंद्र सरकारच्या कामगारविषयक धोरणाला विरोध

मुंबई: केंद्र सरकारचे कामगार कायदे कामगारांच्या विरोधी असल्याचा आरोप भारतीय मजदूर संघाने केला आहे. सरकारने जर या अनुषंगाने जारी केलेला अध्यादेश परत घेतला नाही तर संघ 6 सप्टेंबर रोजी देश पातळीवर निदर्शने करणार आहे. भारतीय मजदूर संघ हा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी निगडीत आहे.

-Ads-

भारतीय मजदूर संघाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघाचे सरचिटणीस व्रिजेश उपाध्याय यांनी दिली. केंद्र सरकारला या विरोधात अनेक निवेदने देण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. अगोदरच अनौपचारीक क्षेत्रातील कर्मचाऱ्याची संख्या वाढलेली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे या अनौपचारिक पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वेगाने वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या जगण्याच्या दर्जावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सागींतले.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने याबाबतच्या सल्लागार मंडळाची ताबडतोब बैठक बोलावण्याची गरज आहे. हा निर्णय रद्द केला नाही तर आगामी काळात आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या चार वर्षात केंद्र सरकारच्या अयोग्य आर्थिक धोरणामुळे एक तर बेकारी वाढत आहे, त्याचबरोबर आहे त्या कामगाराच्या जगण्याच्या दर्जावर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यातून कोणाचेच हित साधणार नसल्याचे ते म्हणाले. इतर कामगार संघटनांनी सरकारच्या कामगार धोरणाला विरोध तीव्र केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)