भारतीय प्राध्यापकांचा अमेरिकेत मोर्चा

ग्रीन कार्ड अनुषेश भरून काढण्याची मागणी
वॉशिंग्टन – अमेरिकेतील ग्रीन कार्ड मंजुरीचा अनुषेश त्वरीत भरून काढावा या मागणीसाठी अमेरिकेत कार्यरत असलेल्या शेकडो भारतीय प्राध्यापकांनी आज येथे मोर्चा काढून निदर्शने केली. ग्रीन कार्डासाठी प्रत्येक देशासाठी प्रशासनाने विशिष्ट मर्यादा ठेवली आहे ती रद्द करावी अशीही त्यांची मागणी आहे.

अमेरिकेत अनेक उच्चशिक्षीत एच-1बी व्हीसावर आले आहेत. त्यांना प्रशासनाच्या सध्याच्या व्हीसा विषयक धोरणामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अमेरिकन नागरीकत्वाच्या ग्रीन कार्डासाठी प्रत्येक देशाला केवळ सात टक्के कोटा निश्‍चीत करण्यात आला आहे त्याचाही फटका तेथील भारतीयांना बसत आहे. सध्याच्या पद्धतीनुसार तेथे गेलेल्या भारतीय नागरीकांना ग्रीन कार्ड मिळण्यासाठी 70 वर्षांपर्यंत प्रतिक्षा करावी लागू शकते असे या प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

अमेरिकन प्रशासनाच्या नव्या इमिग्रेशन धोरणामुळे निर्माण झालेल्या अडचणींची अमेरिकतील अनेक संसद सदस्यांनाही कल्पना आहे त्यांनीही ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरूवात केली आहे. मोर्चाच्या शेवटी झालेल्या सभेत बहुतेक वक्‍त्यांनी देशानुसार घालण्यात आलेला मर्यादित कोट्याची तरतूद रद्द करावी अशी एकमुख मागणी केली आहे. अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे सुमारे तीन लाख लोकांची ग्रीन कार्ड प्रक्रिया खोळंबून राहिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)