भारतीय पत्रकारांच्या मृत्यूबद्दल संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांना चिंदा

संयुक्तराष्ट्रे – भारतात दोन पत्रकारांचा अलिकडेच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्याबद्दल संयुक्तराष्ट्रांच्या सरचिटणीसांनी खेद व्यक्ती करीत या प्रकरणाबद्दल िंचंता व्यक्त केली आहे. जगभरात पत्रकारांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांचे प्रमाणही चिंताजनक आहे असे त्यांनी म्हटले आहे.

संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेरेस यांचे प्रवक्ते फरहान हक यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की अलिकडेच भारतात दोन पत्रकारांचे संशयास्पद मृत्यू झाले हे प्रकरण गंभीर असून जगभरात कोठेही पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांचा सरचिटणीसांनी निषेधच केला आहे. पत्रकारांचा छळ किंवा त्यांच्या विरोधातील हिंसाचार हा त्यांनी कायमच निंदनीय ठरवला असून या प्रकरणातही त्यांची हीच भूमिका आहे असे ते म्हणाले. बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारे मध्यप्रदेशातल्या भिंड येथील पत्रकार संदीप शर्मा यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रकार घडला आहे.

तसेच बिहार मध्येही एका हिंदी दैनिकाचे पत्रकार नवीन निश्‍चल यांचीही भोजपुर जिल्ह्यात हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. त्या प्रकारांची थेट संयुक्तराष्ट्रांतर्फे दखल घेण्यात आली आहे. या दोन्ही पत्रकारांना ठार मारण्याच्या धमक्‍या आल्या होत्या व त्या विषयी त्यांनी पोलिसांत तक्रारहीं दिली होती. या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन संबंधीतांना कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनांनीही केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)