भारतीय नौदलात ‘करंज’ पाणबुडी दाखल

मुंबई – भारतीय नौदलात स्कॉर्पिअन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ‘करंज’ आज दाखल होणार आहे. ही पाणबुडी 67.5 मिटर लांब, 12.3 मिटर उंच आणि 1565 टन वजनाची आहे. येथील माझगाव डॉक येथे स्वदेशी बनावटीच्या या करंज पाणबुडीचे जलावरण करण्यात आले आहे.

सर्व प्रकारातल्या युद्धास उपयुक्त असणारी ही पाणबुडी मेक इन इंडिया मोहिमेतंर्गत तयार झालेली आहे. यातून शत्रूवर अचूक निशाणा साधता येणार आहे. यामुळे कलवरी, खांदेरी नंतर आता करंज पाणबुडीमुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. एक वर्षाच्या चाचणीनंतर आयएनएस करंज पाणबुडी नौदालाच्या ताफ्यात सामील होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)