भारतीय नौदलाच्या ताफ्यात खांदेरी पाणबुडी दाखल

मुंबई : भारताच्या नौदलाच्या ताफ्यात खांदेरी ही अत्याधुनिक पाणबुडी दाखल झाली आहे. स्कॉर्पिन क्‍लासची ही दुसरी पाणबुडी असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते खांदेरीचे जलावतरण मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात आले. नौदलप्रमुख सुनील लांबा यावेळी उपस्थित होते.
फ्रान्सची मेसर्स डीसीएनएस कंपनी आणि माझगाव गोदी यांनी संयुक्तरित्या या पाणबुडीची बांधणी केली आहे. छत्रपती शिवरायांनी सागरावर प्रभुत्व ठेवण्यासाठी खांदेरी बेटावर केलेल्या लढायांची स्मृती जपण्यासाठी पाणबुडीला खांदेरी हे नाव देण्यात आले आहे. खांदेरी पाणबुडी ही डिझेल आणि वीजेवर चालणारी आहे. अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी खांदेरी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अचूक मिसाईल डागूनण्याची क्षमता खांदेरीमध्ये आहे. खांदेरीमध्ये ट्यूबद्वारे लॉंच होणाऱ्या अँटीशिप मिसाईल्सचाही समावेश आहे. तसेच संवाद साधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या मिसाईल्स पाण्यात किंवा बाहेर डागता येऊ शकतात. तसेच या पाणबुडीला या वर्षाच्या अखेरपर्यंत अत्यंत कठीण चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)