भारतीय नेमबाजीत किशोरवयीन नेमबाजांचा ताफा

नवी दिली: सध्या भारतीय नेमबाजीमध्ये अधिकाधिक किशोरवयीन नेमबाज पुढे येत आहेत. कारण, नेमबाजी प्रकारात वरिष्ठ स्पर्धातही लहान खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवता येते. 16 वर्षीय मनू भाकर, सौरभ वर्मा यांनी मागील काही महिन्यात काही सुवर्ण पदके जिंकली आहेत. मनू भाकरने युवा नेमबाजी विश्वचषक, राष्ट्रकुल स्पर्धा, युवा ऑलिम्पिक या सर्व स्पर्धेमध्ये सुवर्णवेध घेतला आहे. तिला फक्त आशियाई स्पर्धेत यश मिळवता आले नाही. तर सौरभ वर्माने देखील तीच्या तोडीची कामगिरी केले आहे.

त्यातच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये 13 वर्षीय ईशा सिंगने मनू भाकर आणि अनुभवी हीना सिद्धूला पराभूत करत तीन सुवर्णपदके पटकाविली होती. याच स्पर्धांमध्ये रायफल प्रकारात मेहूली घोषने 10 वर्षीय अभिनव सिंहाला साथीला घेऊन ज्युनिअर मिश्र सांघीक आणि युवा मिश्र सांघीक प्रकारात सुवर्णवेध घेतले. त्यामुळे पुढील काळात भारतीय नेमबाजांचा डंका वाजणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)