भारतीय नागरिकाचे चीनमध्ये अपहरण

बीजिंग – व्यापारासाठी चीनमध्ये गेलेल्या एका भारतीय नागरिकाचे अपहरण करण्यात आल्याचा संशय आहे. तबरेज अकबरअली बना असे अपहृताचे नाव असून तो मुंबईचा रहिवासी आहे.

तबरेज मागील काही दिवसांपासून चीनच्या यीवू वस्तू बाजारातून बेपत्ता आहे. स्थानिक व्यावसायिकांपासून धोका असल्याची तक्रार त्याने काही दिवसांपूूर्वी यीवूमधील पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा समजू शकलेला नाही. व्यापारविषयक वादातूून त्याचे स्थानिक व्यावसायिकांनी अपहरण केले असावे, असा संशय आहे.

पैशांच्या थकबाकीवरून चीनी व्यावसायिक परदेशी व्यापाऱ्यांविरोधात आक्रमक आणि वादग्रस्त कृती करत असल्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे तबरेजचे अपहरण झाले असावे, असा संशय भारतीय अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्याचा ठावठिकाणा समजावा यासाठी शांघायमधील भारतीय वकिलातीने चीन सरकारशी संपर्क साधला आहे. तर वेगळीच व्यक्ती समजून तबरेजचे अपहरण झाले असावे, असे त्याच्या कुटूंबीयांना वाटत आहे. विविध वस्तूंची जगालीत सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून यीवू बाजाराकडे पाहिले जाते. भारतातील शेकडो व्यावसायिक, व्यापारी त्या बाजारपेठेत नियमितपणे जात असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)