भारतीय ट्रॅक सायक्‍लिस्ट संघांचे आव्हान संपुष्टात 

जकार्ता: भारतीय सायक्‍लिस्ट संघाने आशियाई स्पर्धेतील आपले अभियान निराशाजनक कामगिरीने सुरू केले असून पुरुष आणि महिला संघाचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले असून स्पर्धेत भारतीय संघ सातव्या स्थानी राहिला.
भारतीय ट्रॅक सायक्‍लिस्ट महिला आणि पुरुष संघांनी निराशाजनक कामगिरी करताना स्पर्धेत सातवे स्थान पटकाविल्याने त्यांना पात्रता फेरीतून पुढे जाता आले नाही आणि त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. विशेष म्हणजे महिला आणि पुरुष संघ सातव्या स्थानी राहिले. पुरुष संघातील अपोलोनियस, एसोव आणि रनजित सिंगयांनी 46.862 सेकंदात स्पर्धा संपवली तर महिला संघातील डेबोराह हेरॉल्ड आणि सोनाली चानु यांच्या संघाने स्पर्धा 35.305 सेकंदात स्पर्धा संपवली.
पात्रता फेरीत भारतीय पुरुष संघाने संघातील मनजित सिंग, अथोकपम सिंग, दिलावर आणि राजु बाती यांनी स्पर्धा संपवायला 4.23.251 सेकंदांचा वेळ घेतल्याने पहिल्या पात्रता फेरीत भारतीय संघ गटाच्या तळाशी म्हणजे दहाव्या क्रमांकावर राहिला होता. तर महिलांच्या गटात सोनालि चानु, नयना प्रियदर्शनी, एलांगबम शोभा देवी आणि मेघा गुगडयांनी स्पर्धा 5.5.388 सेकंदात पुर्ण केली. त्यांनाही गटात अखेरचे स्थान मिळाले होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)