भाजपाला विकासाच्या मुद्यावर पाठिंबा ! संग्राम जगताप यांची कबुली

तर भाजपचा पाठिंबा काढून घेऊ!

नगर: भारतीय जनता पक्षाला विकासाच्या मुद्यावर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या नेत्यांनी शहर विकासासाठी निधी देण्याचे कबूल केले आहे. भाजपकडून शहर विकासाबाबत चुकीचे घडल्यास त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. पाठिंबा काढून घेऊ. शहर विकासाचे प्रश्न न सुटल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलनेही करेल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केला. लोकसभेसाठी राष्ट्रवादी भाजपविरोधातच काम करेल, असेही जगताप यांनी यावेळी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेना हा नगरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे शिवसेना महापालिकेत सत्ता स्थापन करणार असे वाटत असतानाच नगरमध्ये मात्र भाजपने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18, भाजपच्या 14, बसपाच्या 4 आणि 1 अपक्ष अशा 37 नगरसेवकांनी भाजपला मतदान केले होते.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाला महापौर व उपमहापौर निवडणुकीत बाहेरून पाठिंबा देण्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांवर प्रदेश कार्यालयातून कारवाईची टांगती तलवार आहे. आठवड्याभरापासून ही कारवाई होणार असे सांगितले जात आहे. परंतु ती कधी होणार, हेच नेमके कळत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांची झोप उडाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसात कारवाई होईल, असे ठामपणे सांगत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)