भारतीय चित्रपटांवर पुर्ण बंदी घालण्याची पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी 

कराची: पाकिस्तान चित्रपट निर्माता संघटनेने भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानात पुर्ण बंदी घालण्यात यावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. या संबंधात माहिती देताना चित्रपट संघटनेचे एक ज्येष्ठ पदाधिकारी चौधरी एझाज कामरान यांनी सांगितले की पाकिस्तानचे चित्रपट भारतात दाखवले जात नाहीत, त्यामुळे त्यांचे चित्रपट येथे दाखवण्याची काहीच गरज नाही. भारताचे चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करून प्रदर्शक आणि वितरक चांगले पैसे कमावतात हे जरी खरे असले तरी पण दीर्घकालिन विचार केला तर भारतीय चित्रपट हे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीसाठी मारक ठरत आहेत याचाहीं विचार त्यांनी केला पाहिजे.
भारतातील काही ठराविक चित्रपटांवर तेथे अलिकडच्या काळात बंदी घालण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने मुल्क, राझी, वीरे दी वेडिंग या सिनेमांचा समावेश आहे. पण तेवढ्याने काम भागणार नाही. भारतातील कोणत्याच सिनेमाला पाकिस्तानात प्रदर्शनाची परवानगी असता कामा नये अशी आमची सरकारकडे मागणी आहे असे कामरान यांनी पीटीआय या भारतीय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की पाकिस्तानी चित्रपटांचे निर्मीती मुल्यही मोठे असते आणि त्याला लोकांचा प्रतिसादही चांगला असतो पण भारतीय चित्रपटांमुळे आमचे मार्केट कमी होते.
अलिकडेच ईदच्या सुमाराला जे पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित झाले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असेही त्यांनी नमूद केले. आमचा लढा हा स्थानिक चित्रपट निर्मार्त्यांसाठी आहे आणि त्यासाठी आम्ही लाहोर उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)