भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना गुगलची आदरांजली

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या जयंती निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. दादासाहेबांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटापासून भारतात खऱ्या अर्थाने  चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 

नाशिकमधील त्र्यंबक येथे गोविंदशास्त्री आणि द्वारकाबाई फाळके यांच्या घरात धुंडिराज यांचा जन्म झाला. मुंबईच्या मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यावर १८८५ साली ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. पुढे १८९० साली बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचा शिक्षण पूर्ण केले. कलेचे प्रचंड वेड असलेल्या फाळकेंनी चित्रकला, वास्तुकला, प्रोसेस फोटोग्राफी अशा अनेक कला आत्मसात केल्या. चित्रपटनिर्मितीच्या अवघ्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ सिनेमे आणि २६ लघुपटांची निर्मिती केली.

मुंबईत ‘लाईफ ऑफ ख्रिस्त’ हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी स्वदेशी चित्रपट निर्मिती करण्याचा ध्यास घेतला. १९१३ साली त्यांनी आपला ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला पहिला मूकपट प्रदर्शित केला. विशेष म्हणजे या मूकपटासाठी लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, रसायनकार, संकलनकार इ. भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)