भारतीय गुंतवणूकदारांचा प्रवास (भाग-२)

भारतीय गुंतवणूकदारांचा प्रवास (भाग-१)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये सातत्याने वाढ झालेली आहे. नुकत्याच गेलेल्या डिसेंबर २०१८ अखेरीस रूपये ८०२२.३३ कोटींची गुंतवणूक भारतीयांनी केली आहे. म्युच्युअल फंड सही है, याचा मोठा प्रसार भारतभर झाल्यामुळे अनेक नवीन गुंतणूकदार या गुंतवणूक प्रकाराकडे आकर्षित झाले आहेत. म्युच्युअल फंड गुंतवणूक प्रकारात भारतीयांनी डिसेंबर २०१८ पर्यंत २२.८५ लाख कोटींची गुंतवणूक केलेली आहे. एकूण ८ लाख ३७ हजार ५६१ फोलिओद्वारे (खाती) ही गुंतवणूक झालेली आहे.

भारतीयांच्या एकूण बचतीचे वाटप पुढीलप्रमाणे झालेले आहे.

प्रॉपर्टी (जागा) – ५३.८ टक्के

सोने – ११.३ टक्के

बँक ठेवी – १५.९ टक्के

विमा – ६.१ टक्के

पीएफ आणि पेन्शन फंड – ५.१ टक्के

रोख – ३.२ टक्के

शेअर आणि म्युच्युअल फंड – ४.६ टक्के

एकूण – १०० टक्के

(स्त्रोत – सीएलएसए)

प्रामुख्याने भारतीय गुंतवणूकदार जागा व सोन्यात मोठा गुंतवणूक पर्याय म्हणून गुंतवणूक झालेली आहे. परंतु गेल्या काही वर्षात या गुंतवणूक प्रकारात मिळालेला परतावा सातत्याने कमी होत असल्याने गुंतवणूकदार आर्थिक गुंतवणुकीच्या पर्यायाकडे वळताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)