भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत

केंद्रीय माहिती आयोगाने दिलेल्या नवीन निर्देशांनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच (बीसीसीआय) हे माहितीच्या अधिकाराच्या कार्यकक्षेत येत आहे. त्यामुळे बीसीसीआय हे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास बंधनकरार असेल. भारतातातील क्रिकेटची सर्वोसर्वा बीसीसीआय ही स्वीकृत संस्था आहे.

क्रीडा मंत्रालय, केंद्रीय सूचना अधिकारी, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि कायदा आयोगाचा अवहाल या सर्व बाबींचा विचार करून माहिती आयोगाने हा निर्णय घेतला. बीसीसीआय माहिती अधिकाराच्या कलाम एच-२मध्ये येत असल्याचा निष्कर्ष माहिती आयोगाचा आहे.

-Ads-

बीसीसीआय कश्याप्रकारे या कायद्याच्या अंतर्गत येते हे माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलूयांनी आपल्या ३७ पाणी आदेशात आदेशात सांगितले. तसेच बीसीसीआयचे अध्यक्ष, सचिव आणि प्रशिक्षकांनी माहिती अधिकाराच्या कायद्याच्याअनुसार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलूयांनी दिले आहेत.

माहिती अधिकार क्षेत्रात येत असल्याने बीसीसीआयने त्यासाठी १५ दिवसात ऑनलाईन आणि ऑफ लाईन यंत्रणा उभी करावी,असेही निर्देश श्रीधर आचार्युलूयांनी दिले आहेत. राष्ट्रीय क्रीडा महामंडळ (NSF) प्रमाणे बीसीसीआयनेही माहिती अधिकार कायद्यानुसार नोंदणी करावी. गीता राणी यांच्यामुळे बीसीसीसीआय प्रकरण माहिती आयुक्तांपर्यंत गेले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)