भारतीय कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू

दक्षिण आफ्रिकेमधील घटना 

जोहान्सबर्ग – भारतीय वंशाच्या कुटुंबातील पाच जणांचा दक्षिण आफ्रिकेत पीटरमॅरिझबर्ग येथे लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पाच जणांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अज्ञात दंगलखोरांनी पेट्रोलबॉम्ब फेकून त्यांच्या घराला आग लावली होती, असे पोलिसांनी सांगितले. अझिझ मानज्रा असे या कुटुंबप्रमुखाचे नाव आहे.

सुमारे 25 वर्षांपूर्वी ते आपल्या कुटुंबियांसमवेत दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झाले होते. गुरुवारी सकाळी मानज्रा यांच्या जळालेल्या घरामध्ये ते स्वतः, त्यांची पत्नी आणि तीन मुले मृतावस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. हे कुटुंब साधारण पंधरवड्याभरापूर्वीच या घरात रहायला आले होते. हे घर खरेदी करण्यासाठी मानज्रा यांनी आपली आयुष्यभराची सर्व पूंजी खर्च केली होती, असे निकतवर्तीयांनी सांगितले.

आग लावणाऱ्या समाजकंटकाचा पोलिस शोध घेत आहेत. या संदर्भात पाच जणांच्या हत्येचे प्रकरण दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)