भारतीय कर्मचाऱ्यांकडून डिजिटल माहितीचा वापर

नवी दिल्ली -डिजिटल प्रेरित आधुनिक अर्थव्यवस्था म्हणून भारताचा विकास साधण्यात डेटा साक्षरतेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचा निष्कर्ष डेटा विश्‍लेषणातील क्‍लिक या आघाडीच्या कंपनीने केलेल्या आशिया-पॅसिफिक डेटा साक्षरता सर्वेक्षणातून अधोरेखित झाला आहे. व्यवसायाचे अधिक धोरणात्मक आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी संबंधित डेटाचा लाभ भारतीय व्यावसायिक कसा घेत आहेत याचे विवेचन या संशोधनात्मक सर्वेक्षणात करण्यात आले आहे.
भारतीय कर्मचाऱ्यांचा कामावर डेटाचा वापर अधिकाधिक करण्यावर भर असतो. 85% कर्मचाऱ्यांनी सांगितले की तीन वर्षांपूर्वी ते करत होते त्यापेक्षा आज ते अधिक प्रमाणात डेटाचा उपयोग करत आहेत आणि जवळजवळ चारपैकी तीन जण (72%) आपल्या सध्याच्या नोकरीमध्ये आठवड्यातून एकदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा डेटा वापरतात. भारतातील कर्मचारी त्यांच्या नोकरीमध्ये डेटा आणि डेटा साक्षरतेचे महत्त्व मान्य करतात.

भारतामध्ये सर्वेक्षण केलेल्या एक हजार पूर्णवेळ कर्मचाऱ्यांपैकी 99% कर्मचाऱ्यांनी डेटा त्यांना त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत करीत असल्याचे सांगितले. उच्च डेटा साक्षरता कामाच्या ठिकाणी त्यांची विश्‍वासार्हता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरत असल्याचे 96% कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सर्वांत जास्त डेटा साक्षरांसह भारत (45% विरुद्ध क्षेत्रीय सरासरी 20%) आघाडीवर असून जपानमध्ये केवळ 6% कर्मचारी स्वत:ला डेटा साक्षर मानतात. भारत 64%, ऑस्ट्रेलिया 39% आणि सिंगापूर 31% मधील सी-सूट आणि संचालक आपल्या डेटा साक्षरतेच्या पातळीबाबत अधिक आत्मविश्‍वास बाळगत असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. वय वषे 55 हून अधिक असलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास या बाबतीत भारतातील 32% आणि ऑस्ट्रेलियातील 20% कर्मचारी या क्षेत्रातील इतर देशांपेक्षा अधिक डेटा साक्षर आहेत. भारतातील 88%), चीनमधील 76% आणि सिंगापूरयेथील 75% कर्मचाऱ्यांना त्यांचे नियोक्ते डेटा मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी साहाय्य करतात.

क्‍लिकचे डेटा साक्षरता तज्ज्ञ पॉल मॅक्‍लेन म्हणाले, वेगाने होत असलेल्या डिजिटायझेशनमुळे भारत आतापर्यंतच्या इतिहासाच्या तुलनेत कधीही नव्हता इतक्‍या जास्त वेगाने डेटा निर्माण करीत आहे. भारतीय कर्मचाऱ्यांनी या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. दहापैकी नऊ डेटा साक्षर म्हणतात की, ते कामात चांगली कामगिरी करीत आहेत. डेटा व्यक्‍तीच्या कामगिरीवर तसेच व्यापकदृष्ट्या मोठ्या व्यवसाय संचालनावर परिणाम करत असतो; त्यामुळे आम्ही भारतातील अधिकाधिक व्यावसायिकांनी त्यांच्यातील डेटा साक्षरता कौशल्य वाढवावे अशी अपेक्षा करतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)