भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सरकार तपास  यंत्रणांवर दबाव टाकत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सीबीआयला सापडत नसल्याचं सीबीआयच्या वतीने कोर्टात सांगण्यात आलं. यावरून न्यायालयाने तपास यंत्रणेला चांगलेच फटकारले. विचारवंतांच्या   हत्येच्या तपासाबाबत तपास यंत्रणांची भूमिका संशयास्पद असून सरकार दबाव टाकत असल्याचा आरोपही यावेळी  पक्षाच्या वतीनं करण्यात आला.

मोर्चामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हातात लाल झेंडे आणि सरकारच्या विरोधातील फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विचारवंतांच्या हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना पकडून सूत्रधार असणाऱ्या संघटनेच्या प्रमुखांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)