भारतीय उच्चायुक्तांनी घेतली इम्रान खान यांची भेट

इस्लामाबाद – भारतीय उच्चायुक्त अजय बिसरीया यांनी पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली. त्यामुळे द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांकडून पाऊले उचलण्यासंदर्भात आशा पल्लवित झाल्या आहेत.
पाकिस्तानमध्ये नुकतीच सार्वत्रिक निवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या निकालानुसार इम्रान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. त्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 जुलैला दूरध्वनीवरून इम्रान यांचे अभिनंदन केले. त्यानंतर बिसरीया यांनी घेतलेल्या इम्रान यांच्या भेटीला महत्व आहे.

-Ads-

यावेळी दोघांमध्ये द्विपक्षीय संबंध आणि इतर मुद्‌द्‌यांवर चर्चा झाली. दोन्ही देशांमधील चर्चाप्रक्रिया पुन्हा सुरू होण्याच्या गरजेवर इम्रान यांनी भर दिला. मात्र, त्यांनी काश्‍मीर मुद्दाही उपस्थित केल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. यावेळी बिसरीया यांनी इम्रान यांना एक क्रिकेट बॅट भेट दिली. त्यावर भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, इम्रान 18 ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असे त्यांच्या पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि इम्रान यांचे जुने मित्र कपिल देव, सुनील गावसकर आणि नवज्योतसिंग सिद्धू यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहितीही पीटीआयने दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)