भारतीय आयटी कंपन्यांच्या अडचणी वाढणार 

अमेरिका कर्मचाऱ्यांच्या व्हीसाचे नियम कडक करण्यावर ठाम 
वॉशिंग्टन: अमेरिकेने कर्मचारी व्हिसासाठीचे नियम कडक करण्याचे ठरविल्यामुळे भारतीय कंपन्यांना एक तर तेथे कर्मचारी कमी पाठवावे लागणार आहेत. त्याचबरोबर या कर्मचाऱ्याचा खर्च वाढणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा परिणाम आता जाणवू लागला आहे. 2018 या वित्त वर्षात एच-1बी व्हिसासाठी विदेशी कामगार प्रमाणपत्र मिळविणाऱ्या जगातील सर्वोच्च 10 कंपन्यांत भारतातील एकमेव टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीचा समावेश झाला आहे. अगोदर यात बऱ्याच भारतीय कंपन्यांचा समावेश असे.
टीसीएसला 20 हजारांपेक्षा जास्त विदेशी कामगार प्रमाणपत्रे मिळाली आहेत. एच-1बी व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी अमेरिकेच्या श्रम मंत्रालयाला एक अर्ज करून विदेशी कामगार प्रमाणपत्र मिळविणे कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. जेवढ्या कामगारांसाठी प्रमाणपत्रे मिळाली असतील, तेवढ्याच कामगारांच्या व्हिसासाठी कंपन्या अर्ज करू शकतात.
लंडनस्थित अर्न्स्ट अँड यंग ही कंपनी सर्वाधिक विदेशी कामगार प्रमाणपत्रे मिळवून पहिल्या स्थानी आली आहे. कंपनीला विशेष व्यवसायासाठी 1,51,164 विदेशी कामगार प्रमाणपत्रे मिळाली आहेत. एकूण प्रमाणपत्रांपैकी 12.4 टक्के प्रमाणपत्रे अर्न्स्ट अँड यंगला मिळाली आहेत. 69,869 प्रमाणपत्रांसह डेलॉईट कन्सल्टिंग दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय-अमेरिकी कंपनी कॉग्निझंट टेक्‍नॉलॉजी तिसऱ्या स्थानी असून, कंपनीला 47,732 प्रमाणपत्रे मिळाली आहेत. कॉग्निझंटनंतर एचसीएल अमेरिका (42,820), के फोर्स आयएनसी (32,996), ऍपल (26,833) यांचा क्रमांक लागला.
सर्वोच्च 10 कंपन्यांत स्थान मिळविणारी टीसीएस ही एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे. सर्वोच्च 10 कंपन्यांत टीसीएसनंतर क्वॉलकॉम टेक्‍नॉलॉजीज आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)