भारतीयांना कतारमध्ये घर घेणे होणार शक्‍य

दोहा – कतार सरकारने विदेशी लोकांना संपत्ती अधिग्रहण कायदा संमत केला असून त्यामुळे येथे राहणारे विदेशी आता स्वतःच्या मालकीची घरे, इमारती घेऊ शकतील. तसेच अन्य मालमत्ता करू शकतील. अर्थात त्यासाठी काही नियम ठरविले गेले असून नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने विदेश नागरिकांसाठी हा चांगला निर्णय घेतला आहे.

यापूर्वी कतारमधील महिलेशी विवाह करणाऱ्या विदेशी नागरिकांना व त्यांच्या मुलाबाळांना कायम रहिवासी म्हणून राहण्याची परवानगी दिली गेली आहे. चांगले काम करणाऱ्या विदेशींनाही अशी परवानगी आहे. त्यांना मोफत शिकाष्ण, आरोग्यसाठी पायाभूत सुविधा मिळण्याचा अधिकारही दिला गेला आहे. नव्या नियमांचा फायदा 21 लाख विदेशी लोकांना मिळू शकणार आहे. कतारची एकूण लोकसंख्या 27 लाख असली तरी त्यातील फक्त 3 लाख मुळचे रहिवासी आहेत. गतवर्षी प्रथमच 80 देशातील नागरिकांना व्हिसा शिवाय प्रवेश देण्याचा निर्णय घेतला गेला होता.दहशतवादाला समर्थन करणारा देश असा आरोप करून कतारवर सौदीसह शेजारील देशांनी अनेक प्रतिबंध घातले असून या देशाबरोबरचे राजकीय संबंध तोडले आहेत. त्यामुळे कतारने देशातील विदेशी नागरिकांना अनेक सवलती देऊ केल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)