भारतीयांचा अभिमानास्पद गौरव 

मुंबई येथील मनोरूग्णांना जगण्याची उमेद देणारे डॉ. भारत वाटवानी आणि लडाखसारख्या दुर्गम भागांत शिक्षण व विज्ञानाच्या क्षेत्रांतकाम करणारे सोनम वांगचुक या दोघांना अत्यंत प्रतिष्ठेचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार आशियाचा नोबेल पुरस्कार समजला जातो. मानसिक अस्वस्थतेमुळे वेगळ्याच विश्‍वात वावरणाऱ्या व स्वत: पासून दूर गेलेल्या तसेच रस्त्यावरच आयुष्य काढणाऱ्या अनेकांना वाटवानी यानी मदत करून उल्लेखनीय काम केले आहे. 1988 मध्ये त्यांनी मुंबईमध्ये श्रध्दा फांउडेशन नावाची संस्था काढली.अनेक मनोरूग्ण व्यक्तींना त्यांनी आधार देवून पुर्नवसन केले. लडाख भागांत वांगचुक यानी दुर्गम भागात विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम सुरू केले .त्याचा परीणाम इयत्ता दहावीच्या निकालावर दिसू लागला. 1996 मध्ये लडाखमध्ये दहावी इयत्तेत पास होणाऱ्यांचे प्रमाण फक्त पाच टक्के होते. ते प्रमाण 2015 मध्येसुमारे 75% अधिक झाले.

लडाखमध्ये जे पाण्याचे संकट उदभवते त्यावरही हिमस्तुपही योजना आणून मात केली. अनेक नापास मुलांना त्यांनी शिक्षण दिले. अनेक प्रयोगशील उपक्रम त्यांनी शाळांत राबविले. याचा परीणाम अनेक विद्यार्थांना शिक्षणाची आवड व गोडी लागली. व्यावसायिक शिक्षणही अनेक विद्यार्थ्यांना दिले. अशा तऱ्हेने एक संस्कारक्षम पिढी घडविण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. या दोघांचा गौरव होणे ही भारताच्या दृष्टीने अभिमानाची बाब होय. समाजासाठी व तळागाळातल्यांसाठी एका समर्पणाच्या भावनेने त्यांनी जे काम केले त्याचा यथोचित सन्मान आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे. या समर्पण भावनेने काम करणाऱ्या दोघांपासून अनेक भारतीयांना स्फूर्ती व उर्जा मिळेल, हे नक्की.
– शांताराम वाघ, पुणे 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)