भारतासह इतर देशात होणाऱ्या निवडणुकात फेसबुकचा दुरुपयोग होणार नाही – मार्क झुकेरबर्ग

नवी दिल्ली – फेसबुक युजर्स डेटा लीक प्रकरणी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकला तंबी दिलीये. देशात होणाऱ्या निवडणुकात ढवळाढवळ केल्यास फेसबुक डिलीट करून टाकू असं त्यांनी म्हंटल होतं. ते अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या फेसबुक डेटा लीक प्रकणावर आपली प्रतिक्रिया देताना बोलत होते.

दरम्यान रवी शंकर यांच्या प्रतिक्रियेनंतर फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने भारतात पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत एक वक्तव्य केलं आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुक डेटा लीक प्रकणावर झुकेरबर्गने चिंता व्यक्त केली. तसंच भारतासह इतर देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत फेसबुकचा दुरुपयोग होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.फेसबुक डेटा लीक प्रकरणानंतर झुकेरबर्गने फेसबुकवर पोस्ट शेअर करत चूक मान्य केली. तसंच यापुढे पूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन दिलं.

I want to share an update on the Cambridge Analytica situation — including the steps we've already taken and our next…

Posted by Mark Zuckerberg on Wednesday, 21 March 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)