भारतासह अनेक देशांच्या दूतावासात संशयित पावडरची पाकिटे -ऑस्ट्रेलियात खळबळ

मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया): भारतासह अनेक देशांच्या दूतावासात संशयित सफेद पावडरची पाकिटे मिळाल्याने ऑस्टेलियात खळबळ माजली आहे. बुधवारी सकाळी ही पावडरची पाकिटे मिळाल्याची गोष्ट उघडकीसआली. संशयित पावडर मिळालेल्या दूतावासंमध्ये भारत आणि अमेरिकेसह डझनभर देशांच्या दूतावासांचा समावेश आहे. पावडरच्या या पाकिटांवर ऍसबेसटॉस असे लिहिलेले असून या पावडमुळे अजूनपर्यंत तरी कोणाचे काही नुकसान झाल्याची खबर नाही. मात्र अँब्युलन्स सेवेने काही लोकांची तपासणी केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मेलबोर्न आणि कॅनबेरा येथील सुमारे देशांच्या दूतावासात ही पावडर पाठवण्यात आली आहे. सर्वप्रथम भारत आणि अमेरिकेच्या दूतावासात सकाळी साडेबाराच्या सुमारास ही पाकिटे मिळाली. हे दोन्ही दूतावास सेंट किल्डा मर्गावर परस्परांपासून जवळच आहेत. त्यांच्यानंतर इतर दूतावासांमध्येही अशाच प्रकारची पावडरची पाकिटे मिळाल्याचे उघडकीस आले. यामध्ये दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, इटली, ग्रीस, इंडोनेशिया, पाकिस्तान, ब्रिटन आदी देशांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिटातून मिळालेली पावडर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली आहे. पावडर पाठवणाराचा शोध चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले. दूतावासांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ही पावडरची पाकिटे पाठविली असावीत असा पोलीसांचा अंदाज आहे. मात्र सामान्यजनांना याचा काहीही त्रास झालेला नाही.

खबरदारी म्हणून दूतावासातील लोकांन मास्क घालून बाहेर येणास सांगितले आहे. पोलीस आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी केमिकल सूट परिधान करून या प्रकरणाचा शोध घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)