भारतावर हल्ला करणाऱ्यांना योग्य वेळी धडा शिकवू – अजित डोवाल

गुरुग्राम: भारतविरोधी कारवाई करणाऱ्या दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना योग्य वेळी धडा शिकवू, अशा शब्दात  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भारतावर हल्ला करणाऱ्यांना इशारा दिला आहे. आम्ही पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीफच्या ४० जवानांना विसरणार नाही, असे वक्तव्य अजित डोवाल यांनी सीआरपीफच्या ८० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित परेड कार्यक्रमात केले.

भारताविरुद्ध अघोषित युद्ध पुकारणाऱ्यांना योग्य वेळ आल्यानंतर उत्तर देण्यात येईल, दहशतवादी असोत अथवा दहशतवाद्यांना मदत करणारे असोत, त्यांना धडा शिकवला जाईल असे म्हणत डोवाल यांनी देशाविरोधात हल्ला करणाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)