भारताला लवकरच अद्दल घडवू – डोनाल्ड ट्रम्प

रशिया सोबतच्या संरक्षण करारानंतर अमेरिका नाराज

वॉशिंग्टन: भारत आणि रशियामध्ये झालेल्या 5 अब्ज डॉलरच्या संरक्षण कराराबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला लवकरच अद्दल घडवू अशा आशयाचं वक्तव्य केलेलं आहे. अमेरिकेचा प्रचंड विरोध झुगारून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या करारावर स्वाक्षरी केली होती. त्यामुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंध बिघडण्याच्या मार्गावर आले आहेत.

भारताने नुकतीच रशियाकडून एस400 मिसाइल संरचना तब्बल 5 अब्ज डॉलरला घेण्याबाबत करार केला आहे. चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या कुरघोड्या पाहता हा करार भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. जानेवारीमध्ये रशियाच्या संरक्षण व्यापारावर अमेरिकेने जाचक निर्बंध लादले होते. तसेच रशियाशी संरक्षणविषयक देणीघेणी करणाऱ्या देशांनाही याचे परिणाम भोगावे लागतील असा सूचक इशाराही अमेरिकेने दिला होता. रशियाकडून सर्वाधिक संरक्षण हत्यारे इराण आयात करतो. यामुळेच इराणच्या तेल निर्यातीवर अमेरिकेने काही दिवसांपूर्वी जाचक निर्बंध लादले आहेत. या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने ट्रम्प यांना भारताच्या कराराबद्दल विचारले असता ते भडकले,’ भारताला अंदाज ही येणार नाही इतक्‍या लवकर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील ‘ असं सुतोवाच ट्रम्प यांनी केलं आहे. चीन-रशिया संरक्षण कराराचाही अमेरिकेने कडाडून विरोध केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)