भारताला मोठ्या भागिदारी करण्याची गरज – अजिंक्‍य रहाणे

ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकेत पारडे जड

ऍडिलेड: सध्या ऑस्ट्रेलिया संघाकडे त्यांचे महत्वाचे फलंदाज संघात नसले तरी त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत त्यामुळे जर भारताला मालिका जिंकायची असेल तर संघाला कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून न राहाता मोठ्या भागिदारी नोंदवण्याची गरज आहे असे विधान भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेयाने केले आहे.

-Ads-

यावेळी पुढे बोलताना रहाणे म्हणाला की, कसोटी सामना जिंकण्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते चांगले वेगवान गोलंदाज संघात असणे आणि सध्या ऑस्ट्रेलियन संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे त्यांच्या संघाचे मालिकेत पारडे भारतीय संघापेक्षा जड असून भारतीय संघाकडे देखिल चांगले गोलंदाज असल्याने भारतीय संघ मालिकेत नक्‍कीच चुरस देइल असेही तो यावेळी म्हणाला.

तसेच ऑस्ट्रेलियन संघ याही वेळी केवळ विराटलाच बाद करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे त्यामुळे इतर फलंदाजांनी दुसऱ्या बाजुने विराटला साथ देताना आपली विकेट सांभाळुन संघाला मोठ्या भागिदारी करत त्याला साथ दिल्यास भारताला विजय मिळवण्या इतपत मोठी धावसंख्या उभारता येईल जेणे करून भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दडपण आणत सामना जिंकता येइल.

यावेळी रहाणेने 2014-15 साली मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात त्याच्या आणि विराट कोहली दरम्यान झालेल्या 262 धावांच्या भागिदारीची आठवन करुन दिली. तो यावेळी म्हणाला की, मिचेल जॉन्सन सहित इतर गोलंदाज त्यावेळी विराट कोहलीला बाद करण्याचा प्रयत्न करत होते आणि मी दुसऱ्या बाजुने सावध फलंदाजी करताना केवळ त्याला साथ देत होतो. त्यामुळे त्यावेळी आम्ही मोठी भागिदारी नोंदवू शकलो.

तसेच तो म्हणाला की सध्या भारतीय संघातील काहि खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून संघ केवल विराट कोहलीवर अवलंबून नाही. त्यामुळे संघावर अतिरिक्त दबाव येणार नाही. तसेच इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यात झालेल्या खराब कामगिरीची चर्चा न करता आगामी मालिकेत कश्‍या प्रकारे चांगली फलंदाजी करता येइल याच्यवर आम्ही लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यामुळे निश्‍चीतच त्याचा फायदा आमच्या फलंदाजांना या मालिकेत होइल असेही त्याने यावेळी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)