भारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार

पुणे – जागतिक राजकारणाचा विचार करता राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. पूर्वी राजनैतिक अधिकाऱ्यांमार्फत देशातील द्विपक्षीय चर्चा व्हायची. मात्र, आता अनिश्‍चितता वाढल्याने राष्ट्रीय सुरक्षेची परिमाणे बदललेली आहेत. चीनचा विचार केला असता भारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार आहे, असे मत निवृत्त राजनैतिक अधिकारी डॉ. अमित दासगुप्ता यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाच्या आणि यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल सिक्‍युरिटी अॅण्ड डिफेन्स अॅनॅलिसेस (वायसी निषदा) विभागामार्फत “चॅलेन्जेस टू डिल्पोमॅसी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात दासगुप्ता बोलत होते. कार्यक्रमास निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.

-Ads-

दासगुप्ता म्हणाले, वेस्टफालिया करारानंतर दोन देशातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी राजनैतिक अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यानंतर तंत्रज्ञानात झालेल्या बदलामुळे राष्ट्रप्रमुख थेट एकमेकांशी संवाद साधू लागले आहेत. सद्यस्थितीत राष्ट्रीय हिताचा विचार करून परराष्ट्र धोरणात बदल केले जात आहेत. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घेतले जात आहेत, युरोपचा विचार केला असता तेथील परिस्थिती अस्थिर आहे, जर्मनी सोडल्यास युरोपातील राष्ट्रासमोर अनेक आव्हाने आहेत. आर्थिक व स्थलांतरितांचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. यामुळे जर्मनीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. चीन सध्या झपाट्याने प्रगती करत आहे. चीनमध्ये झालेल्या सांस्कृतिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणात वैचारिक नेते उदयास आले. त्यामुळे त्यांनी आखलेल्या योग्य धोरणावर सध्याची परराष्ट्रनीती अवलंबून आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशाच्या शिक्षण पद्धतीत मोठे बदल करण्याची गरज आहे. रोजगारभिमुख शिक्षण देणाऱ्या संस्था वाढविण्याची आवश्‍यकता असल्याचे ते म्हणाले.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)