भारताला परफेक्ट बनवण्याची जबाबदारी तरुणांची (प्रभात open house)

संग्रहित छायाचित्र

स्वातंत्र्य मिळवून सत्तरी आज आपण पार केलेली आहे. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री नियतीशी केलेला आपला करार पूर्ण किंवा जमेल तेवढा पूर्ण करण्याच्या प्रतिज्ञेला झालेली ही आपली सत्तर वर्ष अन तेंव्हापासून एक स्वतंत्र सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून आपली घौडदौड चालू झाली जी ‘ खा उ जा ‘च्या रेट्यापर्यन्त येऊन समाजवाद भांडवलशाही या दोन्हीच्या मिलनापर्यंत येऊन, आजतागायत ती चालूच आहे.

लंकेची पार्वती बनवून ठेवलेला आपला देश ते जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था इथपर्यंतचा आपला प्रवास अन जगातील सर्वात तरुण देश ही आपली ओळख. परंतु या चिरतरुण तरुणांच्या खांद्यावर गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ फक्त विकसनशील असलेल्या आपल्या प्रगतशील देशाला विकसित या सीमेपर्यंत नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आली आहे, त्यामध्येही प्रामुख्याने बेकारी, रस्ते, वीज, पाणी, उदयॊगधंदे, गरिबी आणि या सर्वावर उत्तर म्हणून ‘शिक्षण’ हा आपला प्रमुख अजेंडा असणे गरजेचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जातीपतींच्या भिंती अधिकाधिक बळकट होत असताना आपली खरी  शक्ती असलेली तरुणाई सोशल मीडियावर पोस्ट्स टाकून स्वतःच ‘सोशल भान’ दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे,परंतु हा व्हर्च्युअल जगात रमण होऊन सोशल होण्याचा सोस कुठपर्यंत सोसतोय हेही बघणे गरजेचे आहे.

मूलभूत हक्कांबरोबरच काही कर्तव्यं पण आहेत त्यांची पण जाणीव ठेवणं आज आवश्यक आहे नाहीतर घरे जळत राहणार, खड्डे अधिकाधिक मोठे होत राहणार, धरणे गळत राहणार, आणि आपण प्रत्येकजण आपला वेगळा झेंडा घेऊन मुकाटपणे पाहत राहणार, कुणीतरी म्हणून ठेवलाच आहे

हे सर्व चित्र बदलण्याची खरी जबाबदारी तरुणांवर आहे, त्यांच्या कर्तबगारीवर उद्या आपला देश गर्व दाखवणार आहे, त्यामुळे सतत ‘उत्तम’तेचा ध्यास घेऊन पुढे जात राहणे गरजेचे आहे….! सर्व बदल दिवसातून होणार नाहीत वेळ लागेल पण फळे रसाळ न गोड असतील याबाबत दुमत नाही…!!!

– मोरे प्रदीपकुमार रामदास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)