भारताला ‘परफेक्ट’ करण्यासाठी मानसिकताच बदलायला हवी…(प्रभात open house)

‘भारत माझा देश आहे’…. शाळेत असताना आपण सर्वच जण प्रतिज्ञा म्हणायचो ! ( सुदैवाने प्रतिज्ञेमुळे अजूनतरी कोणत्या धर्माच्या ,समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे ऐकिवात नाही) मात्र , “भारत माझा (कधी कधी) देश आहे” असे स्वातंत्र्यदिनीच देशप्रेमाचे भरते येणाऱ्यांसाठी किंबहुना सोयीस्कररित्या देशप्रेम जपणाऱ्यांसाठीचा प्रथम जो बदल अपेक्षित आहे तो म्हणजे ‘मानसिकता’… मग ती देशप्रेमाची असो, रूढी-परंपरा विरोधी व क्रीडा- विज्ञानाची असो किंवा पुरुषप्रधान संस्कृतीची असो.

ही मानसिकता बदलण्याचा पाया आहे शिक्षण. बदलत्या गरजे नुसार पुनर्रचित ‘अभ्यासक्रम आणि त्याचे औद्योगिक संधान’ (Academic-industrial linkage) तसेच ‘कौशल्याधारीत शिक्षण’ किंवा असलेली कौशल्ये अद्ययावत करणे (updating / re-skilling ) याकडे लक्ष्य दिले गेले पाहिजे. शिक्षणाबरोबर आरोग्याकडेही दुर्लक्ष्य करून चालणार नाही. उपलब्ध डॉक्टरांची लोकसंख्येच्या प्रमाणातली घनता, आरोग्य विज्ञान शिक्षण, औषधे इ. पायाभूत सुविधा सुधारण्यावर व त्यावरील खर्च वाढवण्यावर भर असायला हवा. स्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी सुद्धा आपल्याला Technological threats ,cyber security या नवीन दुखण्यांसोबतच आरोग्य- शिक्षणातली ताफवतता यांसारख्या व्याधी ही दूर करायच्या आहेत.

-Ads-

भारताची अर्थव्यवस्था बाळसे धरत असतानाच तिच्यावर USA सारखा ‘शिक्षणाधिष्टीत अर्थव्यवस्था’ बनण्याचा संस्कार व्हायला हवा. R &D , innovations, scientists याकडे तरुणाईचं सामर्थ्य वळवण्याची गरज आहे. राजकीय व्यवस्थेबद्दल बोलायचे झाल्यास तरुणाईचा विशेषतः स्त्रियांचा राजकारणातला सहभाग वाढवण्याची गरज आहे. नाहीतर महिला सरपंच आणि पंचायतीची धुरा ‘सरपंच पति’कडे हे चित्र सर्रास पाहायला मिळते. स्वित्झर्लंड प्रमाणे ‘प्रत्यक्ष लोकशाहीची’ काही तत्वे जसे की, काम न करणारा लोकप्रतिनिधी परत बोलावणे, जनमत घेणे यांचा वापर करता येऊन राजकारणात पारदर्शकता आणि कर्त्याव्यदक्षता आणता येऊ शकते.
भारताप्रमाणेच इतर देशांकडे पाहिल्यास लक्ष्यात येईल की कोणताच देश परफेक्ट नाही! असं असलं तरी त्यादिशेने वाटचाल करण्याची तयारी मात्र देशांतील लोकांची असायला हवी. यातूनच 71 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट ला नेहरुंनी “Tryst with Destiny” मधे वर्णिलेला आणि डॉ. ए .पी. जे. कलाम यांचा ‘vision-२०२०’ चा भारत आपण साकार करू शकू!!!

– वरदा रांजणे, पुणे

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)