भारताला चर्चेसाठी राजी करा; पाकिस्तानचे अमेरिकेला साकडे

वॉशिंग्टन – पाकिस्तानने गुरूवारी भारताला चर्चेसाठी राजी करण्याचे साकडे अमेरिकेला घातले. चर्चेअभावी तणावात आणखीच वाढ होईल, असा इशाराही पाकिस्तानने दिला. दरम्यान, अमेरिकेने विनंती फेटाळल्याने पाकिस्तानची फटफजिती झाली.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी अमेरिकेला साकडे घातले. मात्र, अमेरिकेने त्यांची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे अमेरिका भारताच्या भूमिकेशी सहमत असल्याचेच स्पष्ट झाले. द्विपक्षीय संबंधांमध्ये तिसऱ्या देशाची मध्यस्थी भारताला मान्य नाही. कुरेशी आणि भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेदरम्यान न्यूयॉर्कमध्ये चर्चा व्हावी, असा प्रस्ताव पाकिस्तानकडून काही दिवसांपूर्वी देण्यात आला. तो प्रस्ताव भारताने मान्य केला. तशात पाकिस्तानी सैनिकांनी सीमेलगत भारतीय जवानाची आणि जम्मू-काश्‍मीरात दहशतवाद्यांनी तीन पोलिसांची हत्या केल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे संतापलेल्या भारताने चर्चा रद्द झाल्याची घोषणा केली. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली. आता अमेरिकेनेही चर्चेसाठी मध्यस्थी करण्याची विनंती फेटाळल्याने पाकिस्तानचे हसे झाले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)