भारताला औपचारिक रोजगार निर्मितीची गरज

नवी दिल्ली – भारताने औपचारिक रोजगारनिर्मितीवर अधिक भर देणे आवश्‍यक आहे. जागतिक बॅंकेच्या जागतिक विकास अहवाल 2019 नुसार भारतात अनौपचारिक रोजगाराची संख्या मोठया प्रमाणात आहे.

भारताने औपचारिक क्षेत्रावर अधिक भर दिल्यास अल्प उत्पन्न गटातून भारताचा समावेश मध्यम उत्पन्न गटात होण्याची शक्‍यता आहे. अनौपचारिक क्षेत्रामध्ये कामगारांच्या पूर्ण क्षमतेचा योग्य प्रकारे वापर करता येत नाही. 1999 पासून देशातील आयटी क्षेत्राचा विकास होत आहे.

स्वयंरोजगारापेक्षा देशाला वेतन असणाऱया रोगजाराची आवश्‍यकता आहे. यामुळे 2047 पर्यंत भारत मध्यम उत्पन्न गटात सहभागी होईल.अनौपचारिक क्षेत्र हे प्रामुख्याने अशिक्षित व्यक्तींकडून हाताळले जाते. यामुळे उत्पन्न कमी मिळत असल्याने कर्मचाऱ्यांना रोजगार कमी मिळतो.

अनौपचारिक कंपन्यांकडून औपचारिक क्षेत्राच्या तुलनेत केवळ 15 टक्के काम करण्यात येते असे म्हणण्यात आले.केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे अनौपचारिक क्षेत्रावर परिणाम होऊन रोजगारनिर्मितीवर परिणार झाला. ही झीज भरून काढण्यासाठी औपचारिक क्षेत्रांना अधिक चालना देण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)