भारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट  

नवी दिल्ली – कोणीही भारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा आगामी काळ भारत आणि जगासाठी चांगला नसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या गोष्टीची जाणीव असून सरकार महत्वपूर्ण पाऊल उचलेल. आणि यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहयोग करतील अशी आशा आहे, अशी महत्वपूर्ण टिप्पणी मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुदीप रंजन सेन यांनी नोंदवली आहे.

अधिवास दाखल्यासंदर्भात अमन राणा या तरुणाने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्या. सेन यांनी हिंदू राष्ट्रासंदर्भात टिप्पणी केली. आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभारत न्या. सेन म्हणाले कि, एनआरसी प्रक्रियेत त्रुटी असून अनेक परदेशी नागरिक भारतीय झाले आणि मूळच्या भारतीय नागरिकांना यादीत स्थान मिळत नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फाळणीनंतर पाकिस्तानने स्वतःला इस्लामिक राष्ट्र घोषित केले. परंतु, धर्माच्या आधारे विभाजन होऊनही भारताने हिंदू राष्ट्राऐवजी धर्मनिरपेक्षाची भूमिका घेतली. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश अशा देशामध्ये हिंदू, शीख, जैन, पारसी अशा बिगर मुस्लीम समाजाचा छळ केला जातो. अशा लोकांना कोणत्याही प्रश्नांशिवाय आणि कागदपत्रांशिवाय भारतात राहण्याची मुभा द्यावी आणि भारतीय नागरिकत्व देण्यात यावे. यासाठी खासदारांनी संसदेत कायदा करावा. या निकालाची प्रत पंतप्रधान, गृहमंत्री, कायदामंत्री, मेघालयचे राज्यपाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवावी, असेही न्यायालयाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)