भारताला आणखी किती सराव हवा- बेलिस 

ट्रेव्हर बेलिस यांची विचारणा- सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे रडगाणे बंद करावे
लंडन: कसोटी मालिकेत भारतीय संघ सध्या 0-2 ने पिछाडीवर असल्याने संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक आपले अपयश लपवण्यासाठी मालिकेपूर्वी सरावासाठी वेळ मिळाला नसल्याचे कारण पुढे करत आहेत. मात्र कोणत्याही पाहुण्या संघाला मालिकेपूर्वी सरावासाठी आठवडाभर मिळणे हे काही कमी नाही. त्यामुळे भारतीय संघाने सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे रडगाणे बंद करावे, अशी स्पष्टोक्‍ती इंग्लंडच्या संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी केली आहे.
भारत, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियासारख्या संघांचे वेळापत्रक खूपच व्यस्त असते. त्यामुळे त्यांचे सामने सतत कोणत्या ना कोणत्या संघासोबत सुरू असतात. अशा व्यस्त वेळापत्रकात कोणत्याही संघाला मालिकेपूर्वी सराव सामन्यांसाठी पुरेसा अवधी मिळत नाही. मात्र भारतीय संघाला कसोटी मालिकेपूर्वी सरावासाठी दहा दिवसांचा अवधी मिळाला होता. त्यात त्यांनी एक सराव सामना देखील खेळला, असे सांगून बेलिस म्हणाले की, भारतीय संघाप्रमाणे आमच्या संघानेही एकदिवसीय मालिकेनंतर केवळ आठवडाभरच सराव केला. जर भारतीय संघासाठी त्या दहा दिवसात दोन सराव सामन्यांचे आयोजन केले असते, तर भारतीय खेळाडूंना विश्रांतीसाठी वेळच मिळाला नसता. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंनी सराव सामन्यांसाठी वेळ मिळाला नसल्याचे कारण देणे बंद करावे.
खरे म्हणजे आम्हाला देखील आणखी सराव सामने खेळायचे होते. मात्र एका आठवड्यात दहा दिवस नसतात. त्यामुळे आम्हीही ती परिस्थिती स्वीकारून आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली आहे, असे सांगून बेलिस म्हणाले की, पहिली कसोटी रोमांचकारी झाली. दोन्ही संघ विजयासाठी शेवटपर्यंत झगडले. मात्र दुसरा सामना इंग्लंडच्या खेळाडूंनी एकतर्फी केला. आम्ही जेव्हा फलंदाजीस आलो तेव्हा तेथील वातावरण फलंदाजीस पोषक होते. तसेच आम्ही गोलंदाजीस आल्यावर वातावरण गोलंदाजांना पोषक होते. याचा पुरेपूर फायदा आमच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी उचलला.
शनिवारपासून नॉटिंगहम येथे सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीबाबत बोलताना बेलिस म्हणाले की, नॉटिंगहॅमची कसोटीदेखील आमचा संघ जिंकेल. घरच्या मैदानावर मालिका खेळण्याचा फायदा आमच्या संघातील सर्व खेळाडू योग्य प्रकारे घेत आहेत. त्याच बरोबर नॉटिंगहॅमचे वातावरण व खेळपट्टी देखील आमच्या गोलंदाजांसाठी पोषक असेल असा माझा अंदाज असून ही कसोटी मालिका आम्ही एकतर्फी जिंकू यावर माझा विश्‍वास आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)