पाक लष्कर प्रमुखांची इच्छा
इस्लामाबाद – काश्मीर प्रश्नासह भारताबरोबरचे सर्व द्विपक्षीय प्रश्न चर्चेच्या प्रक्रियेतून सुटले पाहिजेत यासाठी भारताशी चर्चेची प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी सूचना पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी केली आहे. काल काकुल येथील पाक लष्कराच्या मिलटरी अकादमीचा दीक्षांत समारंभ झाला त्यावेळी बोलताना त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
चर्चेच्या माध्यमातूनच काश्मीरसह सर्व महत्वाच्या प्रश्नांवर मार्ग काढला जाऊ शकतो असा आमचा विश्वास आहे. पाकिस्तानने कायमच अशा चर्चेच्या प्रस्तावाचा पुरस्कार केला आहे. तथापी ही चर्चा सन्मानाच्या मार्गाने आणि समानतेच्या वातावरणात व्हायला हवी आहे असेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने आपल्या शेजाऱ्यांबरोबर कायमच सलोख्याचे संबंध अपेक्षिले आहेत. तशी इच्छाही पकिस्तानने वेळोवेळी प्रदर्शित केली आहे असे ते म्हणाले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा