भारताबरोबरचे संरक्षण भागीदारी विधेयक अमेरिकेच्या संसदेत मंजूर

वॉशिंग्टन – भारताबरोबरची संरक्षण भागीदारी आणखी बळकट करण्याचे विधेयक अमेरिकेच्या संसदेने मंजूर केले आहे. भारताबरोबरच्या 716 अब्ज डॉलरच्या संरक्षण भागीदारीचे विधेयक संसदेमध्ये प्रचंड आनंदाने मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे भारत आणि अमेरिकेमधील संरक्षण तरतूदी अधिक समर्थ केल्या जाणार आहेत.

2016 मध्ये भारताला 2016 मध्ये ओबामा प्रशासनाचा कार्यकाळ संपत आला असतानाच अमेरिकेचा प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून निश्‍चित करण्यात आले होते. ट्रम्प प्रशासनाने भारताबाबतचे हे धोरण पुढे तसेच कायम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या संसदेमध्ये 2019 च्या आर्थिक वर्षासाठी “नॅशनल डिफेन्स ऑथोरायजेशन ऍक्‍ट’ हे विधेयक 87 विरुद्ध 10 मतांनी मंजूर केले. संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये हे विधेयक गेल्याच आठवड्यात मंजूर झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता हे विधेयक अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवून देण्यात येईल. ट्रम्प यांच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यामध्ये रुपांतर होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)