भारताने २०१० च्या दिल्ली कॉमनवेल्थचे २५० कोटींचे बिल थकवले

लंडन : सध्या कॉमनवेल्थमध्ये भारतीय खेळाडू यशस्वी कामगिरी करत असताना, मात्र भारत सरकारने २०१० दिल्ली कॉमनवेल्थचे बिल थकवण्यात आल्याने ब्रिटीश कंपनीने भारत सरकारला अत्यंत तिखट शब्दांत पत्र लिहिले असून नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनमधील सॅटेलाइट आणि ब्रॉडकास्ट कंपनी स्पोर्ट इन्फर्मेशन सर्व्हिसेसने (SIS) केंद्रीय क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांना हे दोन पानांचे पत्र लिहिले आहे. SIS कंपनीकडे २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे ग्लोबल कव्हरेज करण्याची जबाबदारी होती. आमचे २५० कोटींचे बिल तात्काळ चुकते करावे अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

स्पोर्ट इन्फर्मेशन सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड अॅमेस यांनी हे पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी भारतीय सरकारने आम्हाला ज्याप्रकारे वागणूक दिली आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रसारण विभागात भारताची प्रतिमा डागाळली असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय खेळ आणि प्रसारण भागात भारताच्या प्रतिमेला तडा गेला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

-Ads-

२०१० मध्ये ३ ते १४ ऑक्टोबर दरम्यान कॉमनवेल्थ गेम्स पार पडले होते. यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. ‘आंतरराष्ट्रीय क्रिडा प्रसारमाध्यमांचे कॉमनवेल्थ गेम्सकडे लक्ष असताना मी एक कठीण आणि लाजिरवाणी गोष्ट तुमच्या (राज्यवर्धन राठोड) निदर्शनास आणू इच्छितो ती म्हणजे भारताने अजून आमचं २५० कोटींचे बिल चुकते केलेले नाही. व्याज पकडले तर ही रक्कम २८० कोटींपर्यंत गेली आहे’, असं अॅमेन यांनी पत्रात लिहिले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)