भारताने शेजारी देशांबरोबर व्यापार वाढवावा

       व्यापारयुद्धासारख्या घटनांमुळे जागतिक व्यापाराची स्थिती खराब

नवी दिल्ली -गेल्या काही दशकांपासून जागतिक व्यापारावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे परिणाम होत आला आहे. आता अमेरिकेने चीन आणि इतर काही देशांच्या विरोधात व्यापारयुद्ध पुकारले आहे. त्यामुळे आताच जागतिक भांडवल आणि चलन बाजारावर परिणाम होत आहे. अशा स्थितीतही काही प्रमाणात निर्यात चालू ठेवण्यासाठी भारतासारख्या देशांनी शेजारी देशांबरोबर व्यापार वाढविण्याच्या शक्‍यता पडताळण्याची गरज असल्याचे एका अभ्यास अहवालात सांगितले आहे.

एचएसबीसीने जागतिक पातळीवरील आयात-निर्यातीचा अभ्यास करून तयार केलेल्या अहवालात सांगितले आहे, की जागतिक स्थिती गुंतागुंतीची होत चालली आहे. अनेक कारणामुळे एका भागात निर्माण झालेल्या तणावाचा सर्व देशावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत आहे. कोणत्याही कारणामुळे क्रुड, शेअर आणि चलनबाजारावर परिणाम होत आहे. त्यामुळे जागतिक व्यापारासमोर अडथळे येत आहेत.

आता ज्या देशांना जागतिक व्यापारात अनेक दशकापासून मोठा फायदा होत आला आहे. असे विकसित देश बचावात्मक भूमिका घेत आहेत. त्यामुळे भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या अनेक देशांसमोर अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी शेजारी देशांशी व्यापार वाढविण्याचा चांगला पर्याय असल्याचे सांगण्यात आले.
भारताने जर शेजारी देशांबरोबर व्यापार वाढविला तर त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो. त्यामुळे भारताला आणि शेजारी देशांनाही फायदा होतो.

त्याचबरोबर जागतिक पातळीवर काही नकारात्मक घटना घडल्या तरी शेजारी देशांबरोबर व्यापार करताना अडथळे कमी येतात. परस्पराच्या गरजा भागतात. शेजारी देशातील सरकारनीच नाही तर कंपन्यांशी परस्पराशी संबंध वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे एकमेकांना उत्पादन प्रक्रियेत मदत करता येणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)