भारताने वेस्टइंडीजला सहज नमवले

भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या तुफान शतकी खेळीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे आज भारताने वेस्टइंडीजवर मोठा विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा वेस्टइंडीजचा निर्णय सलामीवीर रोहित आणि शिखर यांच्या तडाखेबाज खेळीमुळे पाहुण्या संघाला चांगलाच भोवला. भारताने २० षटकांमध्ये २ बाद १९५ अशी धावसंख्या उभारत विंडीजपुढे मोठे आव्हान ठेवले होते.

विंडीज फलंदाजी साठी मैदानात उतरल्यानंतर त्यांचा भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे निभाव लागू शकला नाही. सुरुवातीपासूनच विंडीजच्या फलंदाजीला गळती लागल्याने त्यांचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. विंडीजने ९ गाड्यांच्या मोबदल्यामध्ये कशाबशा १२० धावा जमवत भारतापुढे ७२ धावांनी पराभव पत्करला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)