भारताने विंडीजला 109 धावांत रोखले

कोलकाता: भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्या नंतर फॅबिएन ऍलनने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजी मुळे वेस्ट इंडीजला 20 षटकांमध्ये 109 धावांची मजल मारता आल्याने भारता समोर विजयासाठी 110 धावांचे आव्हान आहे.

यावेळी विंडीजने प्रथम फलंदाजी करताना वेगवान सुरुवात करताना उमेशच्या पहिल्या षटकांत 8 धावांतर खलीलच्या षटकांतही 8 धावा वसूल करताना पहिल्या दोन षटकांतच 16 धावा वसूल केल्या होत्या. मात्र आपल्या दुसऱ्याच षटकांत उमेशने अनुभवी फलंदाज दिनेश रामदीनला बाद करत विंडीजला पहिला धक्‍का दिला. तर, यानंतर चांगली सुरुवात करुन देणारा शाई होप चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. यावेळी होपने 10 चेंडूत 3 चौकाराम्च्या मदतीने 14 धावा केल्या. तर, एकदिवसीय मालिकेतील हिरो ठरलेला शेमरॉन हेतमायर पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहसमोर अपयशी ठरला. हेतमायरला या सामन्यात केवळ 10 धावांची खेळी करता आली.
यानंतर कायरन पोलार्ड आणि डॅरेन ब्राव्होयांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात कायरन पोलार्डला बाद करत कृनाल पांड्याने आपल्या पहिल्या बळीची नोंद केली. तर, लागलीच ब्राव्होही त्याच्या पाठोपाठच तंबूत परतला. त्यामुळे आकराव्याच षटकांत विंडीजची 5 बाद 49 अशी अवस्था झाली होती. त्यामुळे, पन्नाशीच्या आतच विंडीजचा निम्मा संघ माघारी परतला. तर, रोव्हमन पॉवेल देखिल केवळ 4 धावा करुन तंबूत परतल्याने विंदीजची 6 बाद 56 अशी दयनीय अवस्था झाली होती. तर, कर्णधार कार्लोस ब्रेथवेट कडून विंडीजला अपेक्षा होत्या. मात्र, ब्रेथवेट देखिल केवळ 4 धावा करुन बाद झाला.

यानंतर लोकेश राहुलने फॅबिएन ऍलनचा सोपा झेल सोडत त्याला जिवनदान दिले. यानंतर फॅबिएनने धावांचा वेग वाढवत फटकेबाजी करताना 19 चेंडूत 27 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. तर, किमो पॉलने उमेशयादवच्या षटकांत 16 धावा वसूल करत विंडीजच्या संघाला शंभरी गाठुन देत संघाला 109 धावांची मजल मारुन दिली. यावेळी कुलदीप यादवने 3 बळी मिळवले. तर, कृनाल पांड्या खलील अहमद, बुमराह आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)