मुंबई: भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. तिसरी कसोटी वगळता संपुर्ण मालिकेत भारतीय संघ सातत्याने अपयशी ठरला असल्याबद्दल भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या विरोधात आघाडी उघडली असून त्यांना प्रशिक्षकपदावरुन हटवावे अशी मागणी वाढली आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात विजयाची संधी असूनही फलंदाजांनी खराब कामगिरी केल्याने भारताला सामन्याच्या चौथ्याच दिवशी पराभूत व्हावे लागले. तर पाचव्या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाज यांनी खराब कामगिरीकेल्याने भारताने मालिका 4-1 अशी गमावली. या पराभवानंतर रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच सोशल मीडियावर शास्त्री यांना ट्रोल केले जात आहे.

यावेळी एका चाहत्याने ट्विट करत शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या पाठीराख्याने म्हटले आहे की, शास्त्री हे भरपूर बडबड करतात. पण त्यांना संघाची कामगिरी सुधारता आलेली नाही. ते बऱ्याचदा आम्ही आता परदेशातही मालिका जिंकू, असे बोलले होते. पण भारताची या मालिकेतील कामगिरी सर्वांसमोर आहे. त्यामुळे त्यांना प्रशिक्षकपदी राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यांनी मालिकेतील पराभवाची जबाबदारी घेऊन संघाचे प्रशिक्षकपद सोडावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)