भारताने मालिका गमावल्यानंतर रवी शास्त्रींना हटवण्याची मागणी

मुंबई: भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली असून मालिकेत सातत्याने भारतीय सम्घ अपयशी ठरत असल्याबद्दल भारतीय चाहत्यांकडून सोशल मेडियावर रवी शस्त्रीयांच्या विरोधात आघाडी उघडली असून त्यांना मुख्यप्रशिक्षक या पदावरुन हटवावे अशी मागणी वाढली आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात विजयाची संधी असूनही भारतीय संघातील फलंदाजांनी खराब कामगिरी केल्याने भारताला सामन्याच्या चौथ्याच दिवशी पराभुत व्हावे लागले. या पराभवानंतर रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच सोशल मीडियावर शास्त्री यांना ट्रोल केले जात असून त्यांना आता त्यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

यावेळी एका चाहत्याने ट्‌वीट करत शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याने म्हटले की, शास्त्री हे भरपूर बडबड करतात. पण त्यांना संघाची कामगिरी सुधारता आलेली नाही. ते बऱ्याचदा आम्ही आता परदेशातही मालिका जिंकू, असे बोलले होते. पण भारताची या मालिकेतील कामगिरी सर्वासमोर आहे त्यामुळे त्यांना प्रशिक्षकपदी रहाण्याचा कुठलाही अधिकार नाही त्यामुळे त्यांनी मालिकेतील पराभवाची जवाबदारी घेऊन संघाचे प्रशिक्षक पद सोडावे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)