भारतात 5g साठी जोरदार तयारी -अरुणा सुंदरराजन

नवी दिल्ली : जगभरात मोबाइल नेटवर्कच्या बाबतीत फाइव्हजीची जय्यत तयारी सुरू आहे. त्यात आपण या स्पर्धेमध्ये कुठेही मागे पडू नये यासाठी केंद्र सरकार जय्यत तयारी करत आहे. फाइव्हजी देशात लागू करण्यासाठी जूनपर्यंत आराखडा तयार केला जाईल, असे केंद्रीय दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले.

‘सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ या संघटनेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यासाठी सरकारने समाजातील विविध स्तरांतून मदत मागितली आहे. दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि स्टार्टअप्स या सर्वांनी एकत्र येऊन फाइव्हजीसाठी आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे सुंदरराजन यांनी सांगितले.

फाइव्हजी अर्थात मोबाइल वायरलेस प्रणालीची पाचवी पिढी देशभर राबवण्यासाठी भारत हा जगभरातील देशांमध्ये अग्रेसर देश राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशाच्या ‘डिजिटायझेशन’ व ‘डिजिटलायझेशन’ या दोन्ही कार्यक्रमांसाठी लवकरात लवकर फाइव्हजी तंत्रज्ञान लागू होणे आवश्यक आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पायाभूत सुिवधांमधील आव्हानांचा देश गेली अनेक दशके सामना करत आहे. त्यामुळे आता फाइव्हजी आणणे गरजेचे झाले  असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)